‘इंडिया’आघाडीबाबत राहुल गांधींनी केली नवी भविष्यवाणी, म्हणाले,’मी पुन्हा सांगतोय…’

Rahul Gandhi targeted BJP । संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली. यावेळी अहमदाबाद येथील काँग्रेस कार्यालयात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करत राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, हिंसा आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत.असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधींनी उपस्थित केला ‘हा’ सवाल Rahul Gandhi targeted BJP ।
या घटनेबाबत राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी, ‘गुजरात काँग्रेस कार्यालयावरील भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराबाबतचा माझा मुद्दा आणखी मजबूत झाला आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत. गुजरातची जनता त्यांच्या खोटेपणावरून स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवेल. मी पुन्हा सांगतोय – गुजरातमध्ये ‘इंडिया’ जिंकणार आहे!
गुजरात कांग्रेस कार्यालय पर हुआ कायरतापूर्ण और हिंसक हमला भाजपा और संघ परिवार के बारे में मेरी बात को और पुख्ता करता है।
हिंसा और नफ़रत फैलाने वाले भाजपा के लोग हिंदू धर्म के मूल सिद्धांतों को नहीं समझते।
गुजरात की जनता उनके झूठ के पार साफ देख सकती है और भाजपा सरकार को निर्णायक…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2024
काँग्रेसने केले गंभीर आरोप Rahul Gandhi targeted BJP ।
गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हिम्मत सिंग पटेल यांनी भाजपवर आरोप करत म्हटले, “भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. पोलिसांनी तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नव्हती. भाजपचे कार्यकर्ते येऊन काँग्रेस कार्यालयावर हल्ला करत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.” काँग्रेसचे उपनेते शैलेश परमार यांनी सीसीटीव्ही फुटेज देऊन विधानसभेत तक्रार दाखल केली आहे.
गुजरात भाजपने ही मागणी लावून धरली
भाजपचे प्रदेश सरचिटणीस रजनीभाई पटेल आणि मुख्य प्रवक्ते यमल व्यास म्हणाले, “राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसेशी जोडले आहे. त्यांनी हिंदूंचा अपमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशात आणि जगात राहणाऱ्या तमाम हिंदूंची माफी मागितली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली.





