Rahata Crime : राहाता हादरले! यात्रेच्या टेंडरवरून नगरसेवकावर रोखलं पिस्तुल; शहरात तणाव
Rahata Crime : यात्रेच्या नियोजनावरून राहात्यात राजकीय वातावरण तापले; नगरसेवक तुपे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.

Rahata Crime – शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर तुम्ही दुसऱ्याला का दिले ? आमच्या पोटावर पाय देणार का ? असा जाब विचारत नगरसेवक दशरथ तुपे व त्यांचा भाऊ पांडुरंग तुपे यांना तुषार सदाफळ यांनी शिवीगाळ, दमदाटी करत बंदुकीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ व नगरसेवक यांनी या घटनेचा निषेध नोंदवत राहाता पोलिसांना निवेदन दिले. आरोपी सदाफळ यांच्यावर कठोर कारवाई करून नगरसेवक तुपे परिवाराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या घटनेसंदर्भात नगरसेवक दशरथ तुपे, त्यांचे बंधू पांडुरंग तुपे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
राहाता नगरपरिषदेचे पदाधिकारी व नागरिकांनी पोलिसांना आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. ५ मार्च रोजी तुषार सदाफळ यांनी तुपे यांना न करून तुझा भाऊ नगरसेवक झाला आहे.राहाता वीरभद्र महाराज यात्रेतील पाळण्याचे टेंडर तुम्ही तिसऱ्या माणसाला देऊन माझ्या पोटावर पाय देणार का, असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
सोबतच्या अनोळखी आठ-दहा लोकांनी सुद्धा शिवीगाळ केली.त्याचे कारण विचारले असता सदाफळ यानेजवळील पिस्टल काढून शिवीगाळ करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. राहाता पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल कुमावत करत आहे.





