Nagar | राहात्यात मुस्लिम समाजाचा मोर्चा

राहाता, (प्रतिनिधी)- सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल मोहमंद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाने वक्तव्याचा निषेध केला.
शुक्रवारी दुपारी हजारोच्या संख्येने एकत्र जमत राहाता शहरातून पोलीस ठाण्यात मोर्चाचे आयोजन करून महंत रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत पोलिसांना निवेदन दिले.
शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्यानंतर राहाता तालुक्यातील हजारोच्या संख्येने मुस्लिम समाजाने राहाता चौकात मोठ्या संख्येने एकत्र येऊन या मोर्चाचे नियोजन केले होते. राहाता शहरात मुस्लिम समाजाने आपली दुकाने बंद ठेवली होती.
राहाता पोलिसांनी मोर्चात आलेल्या नागरिकांच्या भावना जाणून घेऊन निवेदन द्या, असे सांगितल्यानंतर आंदोलकांनी आधी गुन्हा दाखल करा मगच आम्ही निवेदन देतो, असे म्हणत ठिय्या आंदोलन केले.
पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवून मोर्चात आलेल्या नागरिकांना शांतता ठेवण्याचे अहवाल केले. यावेळी मुस्लिम समाजाने पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांततेच्या मार्गाने मोर्चाचे आयोजन केले होते. या घटने विरोधात राहाता पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.





