राफेल नदाल विम्बल्डनला मुकणार

लंडन – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुखापत झालेली असतानाही इन्जेक्शन घेऊन खेळलेला व विजेतेपद मिळवलेला स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल आगामी विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेला मुकणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातिल सर्वात मानाची मानली जात असलेली विम्बल्डन स्पर्धा येत्या 27 जूनपासून सुरु होत आहे. ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर नदाल आता इअरस्लॅम पूर्ण करण्याची संधी सोडणार का असे विचारले जात आहे. मात्र, फ्रेंच ओपनमधील लढतीत तो इंजेक्शन घेऊन कोर्टवर उतरत होता. अशा परिस्थितीतही त्याने ही स्पर्धा जिंकली.
आता तो दुखापतीवर उपचार घेणार आहे.नदालने 2008 व 2010 सालीविम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. आता यंदा त्याचा सहभाग अनिश्चित मावला जात आहे. फ्रेंच ओपनमधील काही लढतीआधी नदाल डाव्या पायामध्ये इंजेक्शन घेत होता.
उपचारानंतरच चित्र स्पष्ट होणार
नदाल मायदेशी पोहोचला असून आपल्या दुखापतीवर उपचार घेणार आहे. मात्र, त्याच्या पायावर शस्त्रक्रियेची गरज निर्माण झाली तर त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विम्बल्डनमध्ये सहभागी होईन; पण इंजेक्शन घेऊन पुन्हा टेनिस कोर्टवर उतरणार नाही, असेही त्याने या वेळी सांगितले. त्याच्या दुखापतीबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.





