Radhakrishna Vikhepatil : बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी दिले आहेत.

Radhakrishna Vikhepatil : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी दिले आहेत. मंत्रालयात कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा विभागाद्वारे जलविद्युत प्रकल्पाच्या दुरुस्ती व पुर्नबांधणीबाबत धोरण ठरविण्यात आले आहे. हे प्रकल्प १९६३ ते २००२ या कालावधीमध्ये कार्यान्वित झाले आहेत. त्यांचे आयुर्मान २४ वर्षे ते ६३ वर्षे दरम्यान आहे.
जिल्ह्यांमध्ये जलविद्युत प्रकल्प संख्या १६ असून स्थापित क्षमता २०७१ मेगावॅट यासाठी मुदत संपलेले व बंद असलेले हायड्रोप्रोजेक्ट (Radhakrishna Vikhepatil) कार्यान्वित करण्यासाठी महामंडळ स्तरावर प्रक्रिया राबविणेत येईल. जलविद्युत प्रकल्पाचे सर्वसाधारण आयुर्मान ३५ वर्षे गृहित धरण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, अहिल्यानगर महानगरपालिका यांच्यामार्फत शहरातील सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल.
जलसंपदा विभाग व अहिल्यानगर महानगरपालिका, यांच्या समन्वयाने शहरातील काटवन खंडोबा आणि शहर हद्दीतील सीना नदीची पुनर्जीवन काम करण्यात येत आहे. नदीच्या पुर्व व पश्चिम दोन्ही बाजुस काम करण्यात येणार आहे. या कामाची जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन नुकतीच ८ जून रोजी पाहणी केली.






