Rain Update : चांदोली परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी !
महिनाभरापासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याच्या मार्गावर असून सोमवारी दुपारपासून चांदोली परिसरातील क्षेत्रात अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

Rain Update – महिनाभरापासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याच्या मार्गावर असून सोमवारी दुपारपासून चांदोली परिसरातील क्षेत्रात अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
मे महिन्याच्या अखेरीस शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील नाठवडे, मोहरे,चरण, पणुंब्रे वारूण, मराठेवाडी, आरळा, सोनवडे, मनदूर परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी शेतात धुळवाफ पेरणी केली होती. परंतु, मे महिना संपला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतात पेरलेले भात उगवून देखील आले नव्हते.
रविवारी दुपारी शेडगेवाडी, येळापूर व चरण परिसरात सुमारे अर्धा तास जोरात पाऊस पडला होता, सोमवारी आकाशात काळे ढग दाटून आले, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मणदूर, आरळा परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.
तर सायंकाळच्या सुमारास गुढे पाचगणी डोंगर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होत. गेले चार महिने उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.





