Racquet League Tournament ( Table tennis ) : स्पिअर्स, लॅन्सर्स संघांची आगेकूच…

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत स्पिअर्स, लॅन्सर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून पहिला विजय मिळवला. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत स्पिअर्स संघाने कोल्टस संघाचा ५१२-४५४ असा पराभव करून पहिला विजय नोंदवला.
बॅडमिंटनमध्ये स्पिअर्स संघाला कोल्टसकडून १६५-१६९ असा पराभव पत्करावा लागला. टेबल टेनिसमध्ये रुचा अंबिके, अनिरुद्ध साठे, तुषार नगरकर, रोहन छाजेड, प्रियदर्शन डुंबरे, तेजस किंजवडेकर, ओंकार वैद्य, इशान लागु, संजय शहा, कल्पक पत्की, अक्षय ओक, राहुल रोडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्पिअर्स संघाने कोल्टस संघाचा १७९-१२९ असा पराभव करून आघाडी घेतली.
टेनिसमध्ये स्पिअर्स संघाने कोल्टसचा 168-156 असा पराभव करून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात लॅन्सर्स संघाने तलवार्स संघावर ४८८-४५८ असा विजय मिळवला. बॅडमिंटन प्रकारात लॅन्सर्स संघाने तलवार्सचा १७६-१५५ असा पराभव करून संघाचे खाते उघडले. टेबल टेनिसमध्ये लॅन्सर्स संघाला तलवार्स संघाने १३२-१७४ असे पराभूत करून सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/french-open-2024-satwik-chirag-pair-cruises-into-quarterfinals/
टेनिसमध्ये लॅन्सर्स संघाने तलवार्स संघाचा १८०-१२९ असा सहज पराभव करून विजय मिळवला. अन्य लढतीत मस्कीटर्स संघाने रॉकेट्स संघाचा ४९५-४८३ असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.





