Rapid And Blitz Chess Tournament, Poland : आर. प्रग्नानंदची कार्लसनवर मात…

गुकेशची चमक विरली…
स्टुडंटस स्पर्धा जिंकून इतिहास रचलेला जागतिक चॅम्पियनशिप चॅलेंजर डी गुकेश सध्या चिंतेचा विषय आहे कारण तो १,७५,००० बक्षीस रकमेच्या स्पर्धेत ९.५ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. भारताचा अर्जुन एरिगेसी १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर पोलंडचा डुडा जॅन क्रझिस्टोफ १३ गुणांसह त्याच्या मागे आहे. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह १२.५ गुणांसह सहाव्या स्थानावर असून तो जर्मनीच्या व्हिन्सेंट केइमरवर एका गुणाने आघाडीवर आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर असलेला रोमानियाचा किरिल शेवचेन्को ११ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. हॉलंडचा अनिश गिरी १०.५ गुणांसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
Doha Diamond League 2024 : नीरजचे सुवर्ण 0.02 मीटरने हुकले, दुसऱ्या स्थानावर मानावं लागलं समाधान…
ब्लिट्झ स्पर्धेतील खेळाच्या नऊ फेऱ्या अजून बाकी आहेत. वी यी सात विजयांसह 20.5 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. कार्लसनचे 18 गुण असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या नंतर येतो प्रगनानंद. मात्र, या भारतीय खेळाडूचे 14.5 गुण आहेत आणि अशा स्थितीत विजेतेपदासाठी मुख्य स्पर्धा वेई यी आणि कार्लसन यांच्यातच राहिली आहे.





