आर. माधवन सोशल मीडियावर तरुणींशी फ्लर्ट करतो? व्हायरल स्क्रीनशॉटवर अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

R Madhvan | बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात तो एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. तो आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलीसोबत फ्लर्ट करत असल्याचे समोर आल्याने त्याच्यावर टीकाही करण्यात आली. मात्र आता या प्रकरणावर स्वत: आर माधवनने स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारची घटना कोणासोबतही घडू शकते, असे म्हणत त्याने या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे.
चेन्नईमध्ये ‘पॅरेंट जिनी इंक अॅप’च्या लाँचिंग दरम्यान आर माधवनने सोशल मीडियावर होणाऱ्या अनावश्यक चर्चेबद्दल त्याने स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या चर्चेदरम्यान, आर. माधवनने सोशल मीडियावर लोकांशी संपर्कात राहताना येणाऱ्या समस्येचा उल्लेख केला. यावेळी आर माधवन म्हणाला, आता असं होणार आहे की ‘आई-वडिलांना हे माहित असेल की त्यांची मुलं कधी सोशल मीडियाचा वापर करत आहे.’
आर माधवनने उदाहरण देत त्याच्या चाहत्यांना हे कसं होणार याविषयी सविस्तर सांगितले आहे. ‘मी एक कलाकार आहे. मला इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर अनेक लोकं मेसेज करतात. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देऊन समजवतो. एका तरुण मुलीनं मला मेसेज केला की मी तुमचा चित्रपट पाहिला आणि मला खूप आवडला. मला असं वाटतं की तू सर्वोत्तम अभिनेता आहे. खूप छान काम करतोय. तुम्हाला माहित आहे ना… तुला पाहून मी खूप मोटिव्हेट होते. त्यानंतर सगळ्यात शेवटी तिनं खूप हार्ट इमोजी आणि किसचे इमोटिकॉन टाकले.’ R Madhvan |
पुढे आर माधवन म्हणाला, ‘आता जेव्हा कोणता चाहता किंवा चाहती इतक्या सविस्तरपणे त्यांचं मत मांडत असेल. तेव्हा मला त्या व्यक्तीला उत्तर देणे बंधनकारक वाटते. त्यावर मी नेहमीच तुमचे खूप खूप आभार आहे आणि ही खूप दयाळू वृत्ती आहे, देव तुमचे भले करो. माझा तिला हा रिप्लाय होता. ते काय करतात की माझ्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन इन्स्टाग्रामवर शेअर करतात.’
‘आता यात लोकं काय बघतात की तिनं मला हार्ट, किस आणि प्रेमाचे इमोजी पाठवले आणि त्यावर मॅडीनं रिप्लाय दिला. तिच्याशी बोलण्याची संधी हवी म्हणून मी हे केलं नाही. पण तिच्या मेसेजवर प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यात ते फक्त इतकंच दाखवतात. तर लोकांना वाटतं की मॅडी फक्त तरुण मुलींशी बोलतो. जर असं झालं तर मला प्रत्येकवेळी विचार करून बोलावं लागेल. कारण मी फक्त कोणाला तरी मेसेज करतोय आणि हे असं होतंय. तुम्ही कल्पना करू शकतात की यामुळे तुम्ही किती मोठ्या संकटांमध्ये अडकू शकतात,’ असे म्हणत त्याने सोशल मीडियामुळे होणाऱ्या काही संकाटाची माहिती दिली. दरम्यान, माधवन शेवटचा बँक घोटाळ्यांवर आधारित ‘हिसाब बराबर’ चित्रपटात दिसला होता.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : फार्मर फॉर फॉरेस्ट व पाणी फाउंडेशनसारख्या उपक्रमाची राज्याला गरज – सत्यजित भटकळ





