इंदापूर, (प्रतिनिधी)-इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित, आर. के. शहा विद्यालयसत आनंद बाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे, त्यांना प्रत्यक्ष खरेदी विक्री करण्याचा अनुभव मिळावा. नफा-तोटा समजावा यासाठी आनंद बाजार व खाऊ गल्लीचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गिरीश रणछोडदास शहा व पदाधिकारी उमा गिरीश शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होत. आनंद बाजारामध्ये मुलांनी वेगवेगळे रानभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या तसेच फळे आणली होते. मुलांनी पालकांना साथ घालत जोरदार खरेदी विक्री केली. खाऊ गल्लीमध्ये मुलांनी अनेक रुचकर पदार्थांवर ताव मारला. यामध्ये वडापाव, भेळ, आप्पे, पोहे, मचुरियन, पापड इत्यादी पदार्थ आणले होते.
याचबरोबर स्टेशनरी साहित्य किराणा दुकाने, कुल्फी आणि चहा असे सर्व दुकाने परिसरात लावण्यात आली होती. मुले, पालक, ग्रामस्थ यांनी खरेदी विक्रीचा आनंद मनसोक्त लुटला. आनंद बाजारामध्ये पाच हजार रुपये उलाढाल झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.