R Ashwin : ‘मैं अपना ट्रेड करुंगा…!’, अश्विन सीएसकेला सोडण्याबद्दल पहिल्यांदाच बोलला, सॅमसनचीही रिॲक्शन व्हायरल

R Ashwin Sanju Samson funny video viral : आयपीएल 2026 च्या ट्रेड मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन संघापासून वेगळं होण्याच्या विचारात असल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन याच्याही भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या सगळ्या चर्चांदरम्यान, अश्विन आणि सॅमसन यांच्यातील एक मजेदार संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अश्विन-सॅमसन यांचा मजेदार संवाद –
रविचंद्रन अश्विनच्या ‘कुट्टी स्टोरीज विद ॲश’ या कार्यक्रमाच्या आगामी भागाच्या टीझरमध्ये 38 वर्षीय अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यातील गप्पा दिसत आहेत. सॅमसनच्या भविष्याबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. काही अहवालांनुसार, सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनावर नाराज असून, त्यानी ट्रेड किंवा रिलीजची मागणी केली आहे. दुसरीकडे, अश्विन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचेही नातं तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अश्विन सीएसकेशी नातं तोडणार?
Sanju on #KuttiStoriesWithAsh, powered by @PeterEngland_. Drops tomorrow afternoon. pic.twitter.com/J2QQ5Ia5eZ
— Kutti Stories with Ash (@crikipidea) August 8, 2025
अश्विन सीएसके अकादमीच्या संचालकपदावरून हटण्याची शक्यता आहे. या अफवांवर अश्विनने आपल्या खास शैलीत मजेदार प्रतिक्रिया दिली. त्याने या गपशपला हलक्या-फुलक्या अंदाजात हाताळत म्हणाला, “माझ्याकडे खूप प्रश्न आहेत, पण त्याआधी मी ठरवलं की मी स्वतःला ट्रेड करून घेईन. मला केरळला परत राहायला आवडेल. बऱ्याच अफवा पसरताहेत, मलाही काहीच माहिती नाही. म्हणून मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं. मी केरळला परत राहू शकतो का आणि तू चेन्नईला परत जाशील का?” अश्विनच्या या विनोदावर संजू सॅमसन खळखळून हसला.
हेही वाचा – ZIM vs NZ : न्यूझीलंडने मोडला ६७ वर्षांचा विक्रम, कसोटी इतिहासातील नोंदवला तिसरा सर्वात मोठा विजय
व्हिडीओ होतोय व्हायरल –
अश्विनचा हा मजेदार अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहते अश्विनच्या गंभीर अफवांना विनोदी पद्धतीने हाताळण्याच्या क्षमतेचं कौतुक करत आहेत. आयपीएल 2025 च्या लिलावात सीएसकेने अश्विनला 9.75 कोटींना खरेदी केलं होतं. मात्र, यंदाच्या हंगामात अश्विनची कामगिरी साधारण राहिली. त्याने 9 सामन्यांत केवळ 7 विकेट घेतल्या.





