LSG vs RCB : गोलंदाजाच्या अपमानावर अश्विन संतापला, पंतला सुनावलं, काय आहे प्रकरण?

LSG vs RCB Ashwin Criticizes Pant for Withdrawing Mankad Appeal : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलच्या मंगळवारच्या सामन्यात एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत याने आरसीबीचा कर्णधार जितेश शर्मा याला मांकडिंगद्वारे बाद करण्याची अपील मागे घेतल्याबद्दल टीका केली आहे. अश्विन म्हणाला की, पंतच्या या निर्णयामुळे गोलंदाज दिग्वेश राठीचा अपमान झाला आणि त्याला स्वतःला कमी लेखल्यासारखं वाटू शकतं.
काय होतं प्रकरण?
खरंतर, ही घटना आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्याच्या १७ व्या षटकात घडली. एलएसजीचा गोलंदाज दिग्वेश राठीने जितेश शर्मा नॉन-स्ट्रायकर एंडवर क्रिजच्या बाहेर येत असल्याचे पाहिले, म्हणून त्याने बेल्स उडवल्या आणि अपील केले. रिप्लेमध्ये फलंदाज क्रिजच्या बाहेर असल्याचे दिसून आले, परंतु गोलंदाजाने त्याची डिलिव्हरी स्ट्राईड पूर्ण केली होती, म्हणून तिसऱ्या पंचाने त्याला नॉट आऊट घोषित केले. पण सर्वात मोठा वाद तेव्हा झाला, जेव्हा ऋषभ पंतने अपील मागे घेतले आणि त्यानंतर जितेशने येऊन पंतला मिठी मारली.
अश्विन पंतवर संतापला –
It is best avoided coz of the debate it stirs n the scandal it causes
Let #RaviAshwin the lover of manias remain in the history books and if you are radical rule book lover then stop awarding players who play the game in great spirit #RishabhPant #mankad #JiteshSharma #ipl2025 pic.twitter.com/mve9V9P9cA
— Cric Nasir 🏏🦗 (@Nasir0271) May 28, 2025
आपल्या यूट्यूब शोमध्ये अश्विनने जितेश शर्माच्या आउटबाबत बोलताना सांगितलं की, “जर जितेश गेंदबाजाच्या डिलिव्हरी स्ट्राइडपूर्वी क्रीझबाहेर होता, तर तो आउट ठरू शकला असता. गोलंदाजाची अपीलही बरोबर होती. दिग्वेश राठीने पुढचा पाय टाकला तेव्हा जितेश क्रीझमध्ये होता, त्यामुळे तो तांत्रिकदृष्ट्या आउट नव्हता. पण पंतने जे केलं ते चुकीचं होतं.”
हेही वाचा – PBKS vs RCB : पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? जाणून घ्या
अशा घटना गोलंदाजांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतात –
अश्विन म्हणाला की, “कर्णधाराने गोलंदाजाला पाठिंबा द्यायला हवा होता. पण पंतने करोडो लोकांसमोर गोलंदाजाच्या अपीलला नाकारलं, जे अपमानजनक होतं. त्यामुळे कर्णधाराने खेळाडूला साथ द्यावी, त्याला सगळ्यांसमोर कमी लेखू नये. कारण अशा घटना गोलंदाजांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतात. दिग्वेश राठी माझा नातेवाईक नाही, मित्रही नाही, मी त्याला ओळखतही नाही. पण मी म्हणतो, जर तुम्ही त्याच्या अपीलला अशा पद्धतीने नाकारलं, तर तो पुन्हा कधीही अशी अपील करणार नाही.”





