R Ashwin Honored with Padma Shri in Padma Awards 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनला आयपीएल २०२५ दरम्यान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अश्विनचा सन्मान केला. या कार्यक्रमादरम्यान भारताचे उपराष्ट्रपती जगदीप जाखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झाली होती घोषणा –
अश्विनला खेळातील त्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला आहे. अश्विनला सन्मानित करण्याची घोषणा केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली होती. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तो भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.
President Droupadi Murmu presents Padma Shri in the field of Sports to Shri Ravichandran Ashwin. He is among the best Indian cricketers. He has been honoured with many awards and recognitions including Arjuna award and ICC Cricketer of the Year. pic.twitter.com/NiNYAQaiob
— President of India (@rashtrapatibhvn) April 28, 2025
अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलाय निरोप –
अश्विन हा भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ६१९ विकेट्स घेतल्या. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला असला तरी तो अजूनही क्रिकेट खेळत आहे.
हेही वाचा – Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानांमुळे खळबळ; दानिश कनेरियाचे चोख प्रत्युत्तर
बीसीसीआयकडून अश्विनचे कौतुक –
Congratulations to @ashwinravi99 on being conferred the prestigious Padma Shri award by the Hon’ble President of India @rashtrapatibhvn, honouring his remarkable achievements and an illustrious career with #TeamIndia pic.twitter.com/8HlYQx3Dsl
— BCCI (@BCCI) April 28, 2025
अश्विन सध्या आयपीएलच्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल रविचंद्रन यांचे अभिनंदन. जे त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि टीम इंडियासोबतच्या चमकदार कारकिर्दीसाठी मिळाले.