पिंपरी | बचत खाते उघडण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगाच रांगा

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील टपाल विभागात मंगळवारी (दि. १५) रोजी सकाळीपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बचत खाते उघडण्यासाठी महिलांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. यावेळी दिवसभरात दीडशे ते दोनशे बचत खाते उघडण्यात आली.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र गुरुवारी (दि. १०) बँकेत जमा झाल्याने, जमा झालेली रक्कम काढण्यासाठी काही महिलांनी टपाल कार्यालयात गर्दी केली होती. अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आली.
चिंचवड येथील, चापेकर चौकातील टपाल कार्यलयात सकाळापासून महिलांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. तसेच येथे वाहनांना पार्किंग करण्यासाठीही जागा उरली नव्हती. असे चित्र शहरातील प्रत्येक टपला कार्यलयात दिसत होते.
इतर बँकेत महिलांना अधिक रक्कम असल्याने केवळ २०० रुपयांत टपाल विभागात बचत खाते उघडता येत असल्याने महिलांनी याठिकाणी मंगळवारी दिवसभर गर्दी केली होती. सोमवारी मध्यम स्वरूपात गर्दी होती.
असे टपाल विभागातील कर्मचारी यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र गुरुवारी (दि. १०) खात्यात जमा झाल्याने टपाल कर्यालयात पैसे काढण्यासाठीही महिलांची गर्दी झालेली होती.
पोस्टात बचत खाते उघडण्यासाठी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेले पैसे काढण्यासाठी टपाल कार्यालयात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तरी यादरम्यान येथील टपाल विभागातील कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. यामध्ये स्पीड पोस्ट, तिकिटे, पाकिटे विक्री, पार्सल घेणे देणे, टपाल वाटप आदी कामे सुरळीत सुरु होते. -नितीन बने, जनसंपर्क निरीक्षक अधिकारी पोस्ट ऑफिस





