PV Sindhu Runner-up : पी. व्ही. सिंधूचे २८ वर्षांचे स्वप्न भंगले; फ्रेंच ओपन जेतेपदाच्या सामन्यात जागतिक नंबर १ आन से यंगकडून पराभव
PV Sindhu Runner-up : बीडब्ल्यूएफ फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या आन से-यंगकडून २१-१६, ११-२१, १२-२१ असा पराभव झाल्याने पीव्ही सिंधू उपविजेती ठरली.

PV Sindhu Loses French Open 2026 Final to An Se Young : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे फ्रेंच ओपन सुपर ७५० स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अखेर अधुरे राहिले. अॅरिना ग्रँड पॅरिस येथे खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या हायव्होल्टेज अंतिम सामन्यात सिंधूला दक्षिण कोरियाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आन से यंग हिच्याकडून २१-१६, ११-२१, १२-२१ असा तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे १९९८ नंतर फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनण्याची सुवर्णसंधी सिंधूच्या हातातून निसटली.
पहिला गेम जिंकूनही सिंधूला पत्करावा लागला पराभव –
१९९८ मध्ये भारताच्या अपर्णा पोपट हिने फ्रेंच ओपनचे जेतेपद जिंकले होते; त्यानंतर एकाही भारतीय महिला खेळाडूला ही किमया साधता आलेली नाही. सिंधूने अंतिम सामन्याची सुरुवात आक्रमक करत पहिला गेम २१-१६ अशा फरकाने खिशात घातला. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन आन से यंगने आपल्या खेळाचा दर्जा उंचावत सिंधूवर पूर्ण वर्चस्व गाजवले. या विजयासह आन से यंगने सिंधूविरुद्धचा आपला हेड-टू-हेड विक्रम ११-० असा एकतर्फी केला आहे.
चालू वर्षातील दुसरा सुपर ७५० फायनल –
PV Sindhu had lost her previous 10 matches against An Se-young, but insisted that the head-to-head record would have little bearing on her approach on Sunday.
Meanwhile, An Se-young revealed how she plans to celebrate her French Open triumph 🙌
Read more here 👉 https://t.co/SHYpJl42FL
📷: Badminton Europe/YouTube
#FrenchOpen #PVSindhu
— Sportstar (@sportstarweb) October 25, 2026
जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या पी. व्ही. सिंधूसाठी २०२६ या वर्षातील ही दुसरी सुपर ७५० स्पर्धेची फायनल ठरली. यापूर्वी जुलै महिन्यात तिने जपान ओपनचे जेतेपद पटकावताना तीन वेळच्या विश्वविजेत्या आकाने यामागुचीचा पराभव केला होता. चालू स्पर्धेत उपांत्य फेरीत जपानच्या हिना अकेचीला तीन गेमच्या मॅरेथॉन लढतीत २१-१०, २०-२२, २१-१६ असे पराभूत करून सिंधूने प्रथमच फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती.
आन से यंगचा सलग ५० वा विजय; वर्षात ६५-१ चा महाविक्रम –
RUNNERS-UP OF FRENCH OPEN! 🥈
– India’s PV Sindhu 🇮🇳👏 https://t.co/Q42Of6nwGF
— The Khel India (@TheKhelIndia) October 25, 2026
दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा आंतरराष्ट्रीय कोर्टवर प्रचंड दरारा कायम आहे. रविवारी अंतिम फेरीत उतरताना तिचा चालू वर्षातील विक्रम ६५-१ असा थक्क करणारा होता. सिंधूविरुद्धच्या या विजयानंतर तिचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सलग विजयांचा आकडा ५० सामन्यांवर पोहोचला आहे. ऑल इंग्लंड ओपनचा अपवाद वगळता तिने २०२६ या वर्षात खेळलेली जवळपास सर्वच प्रमुख विजेतेपदे आपल्या नावावर केली आहेत.
भारतीय चाहत्यांची निराशा; तरीही सिंधूची जिद्दी झुंज –
🚨 “PV Sindhu is a very strong, aggressive player,” said An Se-young after defeating the Indian in the French Open Super 750 final. Sindhu won the opening game before the world No. 1 fought back to clinch the title in three games, 16–21, 21–11, 21–12.
@Pvsindhu1 @AmrinSiddi78237 @BAI_Media @bwfmedia
https://t.co/GSkSJoiDSq— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 25, 2026
अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी सिंधूने संपूर्ण स्पर्धेत दाखवलेला फॉर्म आणि दिलेली झुंज भारतीय क्रीडाप्रेमींसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. सुरुवातीला पहिला गेम जिंकून तिने जागतिक नंबर १ खेळाडूला बॅकफूटवर ढकलले होते. फ्रेंच ओपनच्या उपविजेतेपदासह सिंधूने आपल्या आगामी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तयारी सकारात्मक दिशेने असल्याचे संकेत दिले आहेत.





