Sindhu Reaches Final : पी. व्ही. सिंधूचे ऐतिहासिक पुनरागमन! जपान ओपनच्या फायनलमध्ये एन्ट्री मारत रचला नवा इतिहास
Sindhu Reaches Final : महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात सिंधूने विद्यमान ऑलिम्पिक विजेती आणि चीनची कट्टर प्रतिस्पर्धी चेन युफेईचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

PV Sindhu Reaches Japan Open 2026 Final Beats Chen Yufei Akane Yamaguchi : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) जपान ओपन (Japan Open 2026) स्पर्धेत इतिहास रचला आहे. १८ जुलै रोजी झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात सिंधूने विद्यमान ऑलिम्पिक विजेती आणि चीनची कट्टर प्रतिस्पर्धी चेन युफेईचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह जपान ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
चेन युफेईविरुद्धची पराभवाची मालिका संपवली! (Sindhu Reaches Final)
हा विजय सिंधूच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या विजयामुळे चेन युफेईविरुद्धचा तिचा सलग ५ सामन्यांची पराभवाची मालिका अखेर संपुष्टात आली आहे. २०१९ च्या बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर चीनच्या या खेळाडूवर मिळवलेला हा सिंधूचा पहिलाच विजय आहे. सामन्यात सिंधूने पहिला सेट २१-१९ असा जिंकून वर्चस्व राखले होते. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १५-१० अशी आघाडीवर असतानाच, चेन युफेईला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार (Retired Hurt) घ्यावी लागली.
तब्बल दोन वर्षांनंतर BWF टूरच्या फायनलमध्ये धडक – (Sindhu Reaches Final)
SINDHU CREATES HISTORY | Enters Final
As 🇨🇳 Chen Y F retires mid match while trailing, Indian queen becomes first Indian WS player to enter #JapanOpen Finals pic.twitter.com/7apthukpmT
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 18, 2026
दोनदा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सिंधूने तब्बल दोन वर्षांनंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या फायनलमध्ये पुनरागमन केले आहे. यापूर्वी तिने २०२४ मधील ‘सैयद मोदी इंटरनॅशनल’ स्पर्धेची फायनल खेळून विजेतेपद पटकावले होते. टोकियोमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानी असलेल्या हान यूचा पराभव केला, तर माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहाराने तिला उपांत्यपूर्व फेरीत वॉकओव्हर दिला होता. (Sindhu Reaches Final)
अंतिम सामन्यात रंगणार जपानच्या अकाने यामागुचीशी मुकाबला – (Sindhu Reaches Final)
PV Sindhu is back in a BWF World Tour final! 🇮🇳🔥
After a 19-month wait, India’s badminton ace storms into the Japan Open Super 750 final, defeating World No. 5 Han Yue with a commanding performance. 💪
Now, one final challenge awaits as Sindhu takes on home favourite and World… pic.twitter.com/XFjGfpBbvB
— SAI Media (@Media_SAI) July 18, 2026
अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर आनंद व्यक्त करताना सिंधू म्हणाली, “अव्वल मानांकित खेळाडूंसोबत खेळताना सुरुवातीपासून एकाग्र राहणे गरजेचे होते. पहिला गेम जिंकणे खूप महत्त्वाचे ठरले.” आता रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात सिंधूचा सामना जपानची स्थानिक स्टार आणि माजी विश्वविजेती अकाने यामागुची (Akane Yamaguchi) हिच्याशी होणार आहे. पहिले जपान ओपन विजेतेपद पटकावून जागतिक बॅडमिंटनवर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे सिंधूचे लक्ष्य असेल.





