England Squad Changes : लॉर्ड्स महामुकाबल्यापूर्वी इंग्लंडचा मोठा निर्णय! टीममधील ‘या’ २ मॅचविनर खेळाडूंना तातडीने केलं रिलीज
England Squad Changes : इंग्लंड संघाने आपल्या स्क्वाडमधील २ महत्त्वाच्या खेळाडूंना तातडीने रिलीज (मुक्त) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

England Release Liam Dawson Tom Banton T20 Blast Final Day India vs England 3rd ODI Lords : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका सध्या १-१ अशा चुरशीच्या बरोबरीत आहे. या मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी, १९ जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी यजमान इंग्लंड संघाने आपल्या स्क्वाडमधील २ महत्त्वाच्या खेळाडूंना तातडीने रिलीज (मुक्त) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (England Squad Changes)
१८ जुलै रोजी होणाऱ्या ‘टी-२० ब्लास्ट’ (T20 Blast) स्पर्धेच्या फायनल डे (Final Day) सामन्यांमध्ये आपापल्या काउंटी क्लबकडून खेळता यावे, यासाठी लियम डॉसन (Liam Dawson) आणि टॉम बँटन (Tom Banton) यांना संघातून सोडण्यात आले आहे. इंग्लंडने त्यांच्या जागी कोणत्याही नवीन खेळाडूचा संघात समावेश केलेला नाही.
डॉसनला मिळाली होती एकच संधी; बँटन बेंचवरच! (England Squad Changes)
🚨 ENGLAND RELEASE LIAM DAWSON AND TOM BANTON FROM THE ODI SQUAD AHEAD OF THE SERIES DECIDER AGAINST INDIA AT LORD’S. 🏏 pic.twitter.com/PrOlDT8vCg
— Clutch Sports (@Clutchsportsz) July 17, 2026
लियम डॉसनला या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती, जिथे त्याने संकटसमयी ६८ धावांची उत्कृष्ट खेळी करत जो रूटसोबत १२१ धावांची भागीदारी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग-११ मधून वगळण्यात आले. दुसरीकडे, टॉप ऑर्डर फलंदाज टॉम बँटनला पहिल्या दोन्ही सामन्यांत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आता हे दोन्ही खेळाडू बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० ब्लास्टच्या बाद फेरीत खेळताना दिसतील. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना नॉर्थम्प्टनशायर आणि स्टीलबॅक्स यांच्यात, तर दुसरा सामना हॅम्पशायर हॉक्स आणि नॉट्स आउटलॉज यांच्यात रंगणार आहे. (England Squad Changes)
भारतीय संघातही एक बदल निश्चित; कुलदीपला मिळणार संधी? (England Squad Changes)
लॉर्ड्सवरील या ‘करो या मरो’च्या सामन्यासाठी भारतीय संघातही एक मोठा बदल निश्चित मानला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झालेला स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर हा अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नाही. सुंदरच्या अनुपस्थितीत कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत बेंचवर बसून राहिलेल्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला सुंदरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





