Pushpa 2 Box Office Collection : ‘पुष्पा… नाम छोटा पर साउंड बहुत बड़ा ! बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा दबदबा कायम; कमाईचा आकडा एकदा पाहाच

Allu Arjun । Pushpa 2 Box Office Collection | ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत त्याने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत.
सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत आपल्या बजेटपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. एवढेच नाही तर 500 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे.
यानंतर आता ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी देखील मोठे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 725 कोटी 8 लाखांची कोटींची कमाई केली आहे. 9व्या दिवशी चित्रपटाने 36 कोटी 4 लाखांची कमाई केली, तर 10व्या दिवशी ‘पुष्पा 2: द रुल’चं कलेक्शन 63.3 कोटी रुपये होतं.
मात्र, आता चित्रपट प्रदर्शित होऊन आता 17 दिवस झाले आहेत. परंतु, अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसत आहे. अभिनेत्यानं बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
चित्रपटाने 15 व्या दिवशी 17.65 कोटींची कमाई केली. 16 व्या दिवशी 14.3 तर 17 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली. या चित्रपटाने 25 कोटींची कमाई केली.
वर्ल्डवाइड किलेशन बद्दल बोलायचे झाल्यास ‘पुष्पा 2’ चित्रपटाने वर्ल्डवाइड 1500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड 1500 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.





