Satara News : एसटी बस मध्ये हरवलेली दागिन्यांची पर्स अवघ्या चार तासात परत; सातारा वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण बरकडे यांची कामगिरी
दीड तोळे वजनाची सोन्याची चैन व काही रोख रक्कम आहे तशीच सुरक्षित होती महिलेने व तिच्या कुटुंबियांनी आभार मानले..

Satara News – एसटी बस मध्ये गहाळ झालेली सोन्याची चैन व पैसे असणारी पर्स सातारा बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण बरकडे यांच्या तत्परतेने अवघ्या चार तासात पुन्हा मिळवून संबंधित मुलीच्या स्वाधीन करण्यात आली या कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की अतित येथील मेघा जगताप या महामार्गावर लांब पल्ल्याच्या गाडीत सातारा येथे येण्यासाठी बसल्या होत्या. पोवई नाका येथे बस मधून उतरल्यानंतर काही वेळाने पर्स गाडीत विसरल्याचे त्याच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ सातारा बस स्थानकावर येऊन माहिती दिली मात्र गाडी कोणती होती हे त्यांना माहीत नव्हते प्रवासाचे तिकीटही पर्स मध्ये राहिल्यामुळे बस कोणत्या आगाराची होती समजणे अवघड झाले होते.
दरम्यान सातारा वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण बरकडे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली अखेर ती बस पुणे येथे असल्याची समजले संबंधित बसमधील चालक वाहकाशी संपर्क साधला असता ती पर्स एसटीमध्येच सापडली ती बस पुन्हा सातारा मध्ये आल्यानंतर सातारा आगार प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पर्स संबंधित मुलीच्या स्वाधीन करण्यात आली.
पर्समध्ये असणारी दीड तोळे वजनाची सोन्याची चैन व काही रोख रक्कम आहे तशीच सुरक्षित होती महिलेने व तिच्या कुटुंबियांनी आभार मानले हरवलेली पर्स कोणताही तपासाचा धागा नसताना सातारा वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण बरकडे यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.




