PBKS vs LSG : अर्शदीप-प्रभसिमरनच्या वादळाने केली लखनौची वाताहत, पंजाबने नोंदवला सातवा विजय

PBKS vs LSG Punjab Kings beat Lucknow Super Giants by 37 runs : अर्शदीप सिंग आणि अझमतुल्ला उमरझाई यांनी केलेल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबने लखनौचा ३७ धावांनी पराभव केला. या विजयासह यंदाच्या हंगामातील सातवा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरनसिंगच्या वादळी खेळीच्या जोरावर २३६ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, प्रत्युत्तरादाखल लखनौचा संघ १९९ धावाच करु शकला.
पंजाबने नोंदवला सातवा विजय –
धर्मशाळा येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ५४ व्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी निवडली. पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या ९१ धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या ४५ धावांच्या जोरावर २० षटकांत पाच गडी गमावून २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनौ संघ निर्धारित षटकांत सात गडी गमावून केवळ १९९ धावा करू शकला. त्यांच्याकडून आयुष बदोनीने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. दरम्यान, पंजाबकडून अर्शदीपने तीन आणि उमरझाईने दोन विकेट घेतल्या. याशिवाय मार्को जानसेन आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
Stepped up. Stood tall. Delivered. 🫡
Prabhsimran Singh’s brilliance with the bat ensured a Player of the Match award & a much-needed win for #PBKS ❤️
Relive his innings ▶ https://t.co/nOODb3CMfY#TATAIPL | #PBKSvLSG | @PunjabKingsIPL pic.twitter.com/rdMGDhG05C
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
पंजाबने गुणातालिकेत पटकावले दुसरे स्थान-
🔝 performance at the 🔝 of the mountains! 🗻@PunjabKingsIPL extend their winning run with a picture-perfect victory at a picturesque venue ❤
Scorecard ▶ https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG pic.twitter.com/EHREwPr484
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
११ पैकी सात सामने जिंकणारा पंजाब १५ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा नेट रन रेट +०.३७६ झाला आहे. दरम्यान, लखनौ हंगामातील सहाव्या पराभवासह सातव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात १० गुण आहेत आणि नेट रन रेट -०.४६९ होतो. आरसीबी १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर मुंबई आणि गुजरात १४-१४ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा – Riyan Parag : जो मैं बोलता हूँ, वो करता हूँ…!’, दोन वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी परागने करुन दाखवली खरी
बदोनी-समदची सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी –
𝗔𝗲𝗿𝗶𝗮𝗹 𝗠𝗼𝗱𝗲 🔛
Courageous knocks by Ayush Badoni and Abdul Samad 👏
Updates ▶ https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/gjZNaWykzw
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. संघाने ५८ धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या. एडन मार्करम (१३), मिचेल मार्श (०), निकोलस पूरन (६) आणि ऋषभ पंत (१८) यांना प्रभावित करण्यात अपयश आले. अशा परिस्थितीत आयुष बदोनी आणि अब्दुल समद यांनी आघाडीची सूत्रे हाती घेतली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, समद २४ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, आयुष बदोनीने ७४ धावांची दमदार खेळी खेळली. तथापि, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आवेश खान आणि प्रिन्स यादव अनुक्रमे १९ आणि १ धावा काढून नाबाद राहिले.





