PBKS vs LSG : प्रियांश-कोनोली जोडीच्या जोरावर पंजाबचा ‘किंग’ सायझ विजय! धावांचा डोंगर उभारत लखनौची उडवली दाणादाण
PBKS vs LSG : पंजाबने लखनौचा धुव्वा उडवत यंदाच्या हंगामातील आपला सलग पाचवा विजय नोंदवत गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत केले आहे.

PBKS vs LSG Punjab Kings fifth consecutive win : न्यू चंदीगडमधील मुल्लांपुर स्टेडियमवर आयपीएल २०२६ चा २९ वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) फलंदाजीचा नवा अध्याय लिहित ऋषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा उडवला. पंजाबने या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ मधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. पंजाबने २० षटकांत तब्बल २५४ धावांचा हिमालय उभा केला. या विशाल लक्षाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला ५ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते म्हणजे युवा जोडी प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली.
१८२ धावांची ऐतिहासिक भागीदारी –
Batting in 5️⃣th gear 🏎️
The third-highest partnership for #PBKS and it came at a run rate of 13.65 🤯
RELIVE THEIR SIXES ▶️ https://t.co/Vpdb5Gn8i8#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvLSG | @PunjabKingsIPL pic.twitter.com/hLbuCnnqSx
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
पंजाबची सुरुवात अत्यंत आक्रमक झाली. प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ८० चेंडूंत १८२ धावांची स्फोटक भागीदारी केली. प्रियांशने ३७ चेंडूंत ९३ धावांची वादळी खेळी केली, तर कूपर कोनोलीने ४६ चेंडूंत ८७ धावा कुटल्या. या दोघांनी मिळून १६ षटकार आणि १२ चौकार मारत लखनऊच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. दुर्दैवाने, हे दोन्ही फलंदाज आपल्या शतकापासून काही धावा दूर राहिले, मात्र त्यांनी संघाला ऐतिहासिक टप्प्यावर नेऊन ठेवले.
मार्क्रमच्या एका ओव्हरमध्ये ३२ धावा!
3️⃣2️⃣ runs of pure destruction 💥
🎥 Relive this carnage 👉 https://t.co/EpOcpY1lLb#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvLSG | @PunjabKingsIPL pic.twitter.com/eI5tuleNYM
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
डावातील १३ वे षटक या सामन्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. लखनऊच्या एडन मार्क्रमला गोलंदाजीसाठी बोलावण्यात आले, पण ते त्याला महागात पडले. कूपर कोनोलीने पहिल्या तीन चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकले. त्यानंतर एक वाईड आणि एक धाव आली. शेवटच्या दोन चेंडूंवर प्रियांश आर्याने आपला जलवा दाखवत सलग २ षटकार मारले. अशा प्रकारे एकाच षटकात ३२ धावा वसूल करून पंजाबने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली.
The wickets keep coming 👊#LSG bowlers regroup and stage a comeback 👏
Updates ▶️ https://t.co/u5eUR1eqdA#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvLSG pic.twitter.com/eOuOb83Lwi
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
लखनौची गोलंदाजी ढेपाळली –
लखनौचे सर्वच गोलंदाज पंजाबच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. प्रिन्स यादव आणि मणिमारन सिद्धार्थ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले, तर मोहम्मद शमी आणि मोहसिन खानला १-१ विकेट्स मिळाली. मात्र, प्रिन्स यादव वगळता इतर सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट १० च्या वर राहिला, जो लखनौच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला.





