Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया

Sai Sudharsan Named in India Test Squad for England Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. डावखुरा फलंदाज बी साई सुदर्शनचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय कसोटी संघात सामील झाल्यानंतर, त्याने तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खास क्षण असल्याचे वर्णन केले. या प्रसंगाचे वर्णन अविश्वसनीय असल्याचे सांगितले. त्याच्या तांत्रिक कौशल्यामुळे तो इंग्लंडसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत खूप महत्त्वाचा ठरू शकतो, असे मानले जाते.
देशासाठी खेळणे हा एक मोठा सन्मान –
देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील स्फोटक फलंदाजी आणि तांत्रिक परिपक्वता यामुळे साई सुदर्शनला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. संघात निवड झाल्याची बातमी मिळताच सुदर्शन म्हणाला की, “एखाद्या क्रिकेटपटूसाठी त्याच्या देशासाठी खेळणे हा एक मोठा सन्मान आहे असे मला वाटते. ही एक अद्भुत, खास आणि अविश्वसनीय भावना आहे. क्रिकेट खेळायला सुरुवात करणारा कोणताही खेळाडू कसोटी क्रिकेट खेळू इच्छितो जे त्याचे अंतिम ध्येय असते.”
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
आज माझे पालक आनंदी असतील –
या यशामागील त्यांच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. या पदापर्यंत पोहोचण्यात त्याच्या पालकांचे आणि नातेवाईकांचे योगदान आठवत तो म्हणाला की, “मला माहित आहे की आज माझे पालक आनंदी असतील. मी माझ्या आईवडिलांशी आणि भावाशी फेसटाइमवर बोललो. मला याचा खूप आनंद आहे. तसेच काही कौटुंबिक मित्रांशी आणि जवळच्या मित्रांशी बोललो, ते खूप आनंदी होते आणि मी त्यांच्या चेहऱ्यावर ते पाहू शकत होतो. त्यामुळे ही तर फक्त सुरुवात आहे, पूर्ण कहाणी अजून बाकी आहे.”
हेही वाचा – RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड
गिल कर्णधार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला –
तमिळनाडूचा हा डावखुरा फलंदाज गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार नियुक्त केल्याने आनंदी आहे. तो म्हणाला, “तो निश्चितच देशाचा गौरव वाढवेल आणि देशासाठी महान कामे करेल. त्याच्या नेतृत्वाखाली मी माझी पहिली कसोटी मालिका खेळणार आहे याचा मला आनंद आहे.” साई सुदर्शन सध्या सुरु असलेल्या आयपीएल २०२५ तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक ६३८ धावा केल्या आहेत.





