Punjab Congress : पंजाब कॉंग्रेसमध्ये कुठलेही बंड नाही; प्रदेशाध्यक्ष वारिंग यांची ग्वाही
पंजाब कॉंग्रेसमध्ये (Punjab Congress) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग डॅमेज कंट्रोलसाठी पुढे सरसावले. पक्षात बंडाची ठिणगी पडल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली.

Punjab Congress : पंजाब कॉंग्रेसमध्ये (Punjab Congress) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग डॅमेज कंट्रोलसाठी पुढे सरसावले. पक्षात बंडाची ठिणगी पडल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. तसेच, नाराज नेत्यांच्या मनधरणीसाठी समेटाचा सूरही आळवला.
आपची सत्ता असणाऱ्या पंजाबमधील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर (Punjab Congress) येऊन ठेपली आहे. ती विचारात घेऊन कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी वारिंग यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि त्यांच्या समर्थकांना रूचला नाही.
काही आजी-माजी आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी चन्नी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी करण्यात आली.
एवढेच नव्हे तर, त्या पदासाठी चन्नी यांचे नावही पुढे करण्यात आले. त्यामुळे पंजाब कॉंग्रेसमधील गटबाजीने डोके वर काढल्याच्या, बंडाचे निशाण फडकल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, वारिंग यांनी शनिवारी त्या चर्चा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पंजाब कॉंग्रेस एकजूट आहे. चन्नी, इतर प्रमुख नेते आणि मी स्वत: सर्वांना एकत्र दिसू. चन्नी हे पक्षाचे ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते आहेत.
त्यांना किंवा इतर कुठल्याही नेत्याला पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवायचे ठरवल्यास (Punjab Congress) माझी कुठलीही हरकत नसेल. मी स्वत: मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आल्याचे पाहणे एवढेच माझे उद्दिष्ट आहे. मी कायमस्वरूपी प्रदेशाध्यक्ष नसेन. ते पद इतर कुणाकडे गेले तरी मला कुठली समस्या नसेल, अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.






