Pune News : पाणी कपात करता, मग पाणीपट्टी का वसूल करता?
Pune News : महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणीकपात केली जात असताना मिळकतकरातील पाणीपट्टी मात्र पूर्ण वसूल केली जात आहे.

Pune News : महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणीकपात केली जात असताना मिळकतकरातील पाणीपट्टी मात्र पूर्ण वसूल केली जात आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. (Pune News)
त्यामुळे पाणीपुरवठ्यात जेवढी कपात केली जाते, तेवढ्याच प्रमाणात पाणीपट्टी आणि जल लाभ करात सवलत द्यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune News)
धरणांतील मर्यादित पाणीसाठा आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली आहे. आगामी काळात ही कपात वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (Pune News)
कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागांतील नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. (Pune News)
महापालिका संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी वसूल करत असेल, तर नागरिकांना पूर्ण पाणीपुरवठा करणेही आवश्यक आहे. पाणीपुरवठ्यात कपात करून नागरिकांना स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याने पाणीपट्टीत प्रमाणानुसार सवलत देणे न्याय्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. (Pune News)
ज्या नागरिकांनी वर्षभराचा मिळकतकर आगाऊ भरला आहे, त्यांच्या पाणीपट्टीतील सवलतीची रक्कम पुढील आर्थिक वर्षाच्या मिळकतकर देयकात समायोजित करावी. तसेच, पाणीटंचाईच्या काळात महापालिकेने आवश्यक त्या भागांत मोफत टँकरने पाणीपुरवठा करावा आणि खासगी टँकरच्या अतिरिक्त दरांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही कदम यांनी केली आहे. (Pune News)
Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा..! वाढीव पाणीकपातीला तूर्तास ब्रेक; महापौरांचे प्रशासनाला आदेश


