Pune: देसाई महाविद्यालयातर्फे वारकरी चरण सेवा

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुण्यातील आगमनाचे औचित्य साधून द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे वारकरी चरण सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ या विभागांतील विद्यार्थ्यांनी उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखांमधील विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी वारकऱ्यांची चरण सेवा केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर घोडके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नीता बोकील, तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन व डॉ. विद्या मिठारे याप्रसंगी उपस्थित होते. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. डॉ. विलिना इनामदार यादेखील वारकरी चरण सेवेसाठी उपस्थित होत्या.





