Pune news : महाविद्यालयीन तरुणाचा वसतिगृहात आढळला मृतदेह
Updated On:

पुणे : विधी अभ्यासक्रम करणाऱ्या महाविद्यालयीन तरुण वसतिगृहात मृतावस्थेत सापडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
भूषण ढुमणे ( १९, मूळ रा. वर्धा) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. भूषण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात भूषण बेशुद्धावस्थेत पडल्याचे लक्षात आले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांने याबाबतची महिती महाविद्यालयीन प्रशासनाला दिली.
त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.





