जानवे काढण्यावरुन प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; बिदरमधल्या महाविद्यालयात वेगाने कारवाई

बिदर – कर्नाटकातील बिदर येथे, साई स्पृती पीयू कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. १
७ एप्रिल रोजी बिदरमधील या कॉलेजमधील कर्नाटक सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा सुचिव्रत कुलकर्णी या विद्यार्थ्याने केला होता. त्यावरुन हा वाद निर्माण झाला होता.
खरंतर, १७ एप्रिल रोजी झालेल्या कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सीईटी परीक्षा) दरम्यान, सुचिव्रत कुलकर्णीला सांगण्यात आले होते की, त्याने जर जानवे काढले नाही, तर त्याला परिक्षेल बसता येणार नाही.
सुचिव्रतने जानवे हे धार्मिक प्रतीक असल्याचे सांगून तो काढण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आले आणि तो घरी परतला.
या घटनेवर विद्यार्थी सुचिव्रत कुलकर्णीची आई नीता कुलकर्णी यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या मुलाने सांगितले की तो जानवे काढू शकत नाही कारण तो धार्मिक श्रद्धेशी जोडलेला आहे.
तरीही, त्याला परीक्षेतून काढून टाकण्यात आले. हे खूप चुकीचे आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, त्यांच्या मुलाची पुनर्परीक्षा घ्यावी, किंवा त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश द्यावा, ज्याचे शुल्क सरकार किंवा संबंधित महाविद्यालयाने भरावे.
आदिचुंचनागिरी पीयू कॉलेजमध्येही वाद झाला होता
यापूर्वी आदिचुंचनगिरी पीयू कॉलेजमध्येही असाच वाद निर्माण झाला होता. सीईटी परीक्षा केंद्र असलेल्या आदिचुंचनगिरी पीयू कॉलेजच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या अधिकाऱ्यांवर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे जानवे काढण्यास सांगण्याचा आरोप आहे. याप्रकरणी परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या दोन होमगार्डना निलंबित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास सांगितले होते.





