Pune: मतदान केंद्रांजवळच वाहन तळाची सुविधा

पुणे – पुणे महापालिका क्षेत्रातील दहा हजांराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी मतदानादिवशी (२० नोव्हेंबर) तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
अशा मतदान केंद्र इमारती ६८ असून, शिरूर विधानसभा मतदारसंघात १, पुरंदर ४, वडगावशेरी १६, शिवाजीनगर ५, कोथरूड ९, खडकवासला ९, पर्वती ४, हडपसर १७ , पुणे कॅन्टोन्मेंट २ आणि कसबापेठ १ इमारतीचा समावेश आहे.
याशिवाय शहरातील इतर मतदान केंद्रासाठीही तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
यामध्ये शिरूर विधानसभा मतदासंघात ३, पुरंदर ५, वडगावशेरी ४१, शिवाजीनगर २१, कोथरूड ११, खडकवासला १७, पर्वती २७, हडपसर ४१ , पुणे कॅन्टोन्मेंट ३४ आणि कसबापेठ २० याप्रमाणे २२० मतदान केंद्रे असल्याचे डॉ. दिवसे यांनी सांगितले.





