हगवणेंचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली
Updated On:

पुणे – वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात तिचा पती शशांक हगवणे याच्यासह कुटुंबीयांना अटक करण्यात आलेली आहे. शशांक हागवणे आणि त्याचा भाऊ सुशील हगवणे यांना बेकायदेशीर शस्त्र परवाना दिले गेल्याचे उघडकीस आले आहे.
हगवणे बंधूना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना देणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा जालींदर सुपेकर यांची उप महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांचे पद विशेष पोलीस महानिरीक्षक असताना देखील ते पद एका टप्प्याने अवनत करून संबंधित बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गृह विभागाने सुपेकर यांचा संशयास्पद सहभाग दिसून आल्यानेच अशाप्रकारे कठोर कारवाई केल्याची पोलीस दलात चर्चा आहे.





