पुणे : आज 197 केंद्रांवर लसीकरण
Updated On:

पुणे- करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी 197 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असतील. कोविशील्डचे 186 केंद्रांवर प्रत्येकी 100 तर, कोवॅक्सिनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असतील.
ज्यांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 10 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.





