पुणे : ईद-ए-मिलादनिमित्त शनिवारी वाहतुकीत बदल

पुणे : शहरात महंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) ही उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने 21 सप्टेंबर (शनिवारी) रोजी शहरात मिरवणुका काढण्यात येणार आहे. यामुळे शहरातील ज्या ज्या भागातून ही मिरवणूक जाणार आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. नाना पेठ, लष्कर भाग तसेच लक्ष्मी रस्त्यावरील (संत कबीर चौक ते हमजेखान चौक) वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
त्यामुळे नाना पेठ, लष्कर भाग तसेच लक्ष्मी रस्त्यावरील (संत कबीर चौक ते हमजेखान चौक) वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. नाना पेठेतील मनुशाह मशिद परिसरातून मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे.
संत कबीर चाैक,ए.डी. कॅम्प चौक, पद्मजी पोलीस चौक निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामन तालीम चौक, मुक्तीफौज चौक पासून डावीकडे वळून कुरेशी मशिदीचे मागील जॉन महंमद रोडने बाबाजान दर्गा चौक ते चारबावडी पोलीस चौकीचे पाठीमागून शिवाजी मार्केट ते सेंट्रल स्ट्रीट रोडने भोपळे चौक गांव कसाब मशिद समोरुन मुक्तीफौज चौक ते पुलगेट चौक, डावीकडे महात्मा गांधी रोडने (१५ ऑगस्ट चौक) महमंद रफी चौक ते महावीर चौक आणि त्यानंतर डावीकडे वळून साचापीर स्ट्रीटने महात्मा फुले चौक- संत कबीर चौक – नानाचावडी चौक -अल्पना सिनेमा ते हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने सरळ गोंविद हलवाई चौक- सुभानशहा दर्गा चौक – सिटीजामा मशिद शुक्रवार पेठ याठिकाणी मिरवणुकीची सांगता होणार आहे.
यामार्गावर मिरवणुकी काळात वाहतूक बंद असणार आहे. पर्यायी मार्ग देण्यात आले असून नागरिकांनी त्याच्या वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या मार्गावर आणि उपरस्त्यांवर मिरवणुक संपेपर्यंत वाहने लावता येणार नाही.





