Arijit Singh’s concert Pune: अरिजित सिंहच्या कार्यक्रमानिमित्त 16 मार्चला वाहतुकीत बदल

पुणे – बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंहचा १६ तारखेला पुण्यात कार्यकम होणार आहे. मागील वर्षी देखील अरिजित सिंहचा कॉन्सर्ट पुण्यात पार पडला होता. त्याचा १६ मार्चला लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. हा इव्हेंट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या ठिकाणी होणार आहे. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा इवेंट सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान या कॉन्सर्टनिमित पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहूतकीत काहीसे बदल जाहीर केले आहेत.
वाहतूकीतील बदल :
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या देहू रोड एक्झिटवरून डावीकडे टर्न घ्यावा. नंतर पुन्हा डावीकडे वळून मामुर्डीजवळील सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून येणाऱ्या वाहनांनी किवळे पुलावरून मुकाई चौकाकडे जाण्यासाठी यू-टर्न घ्यावा घेऊन सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
शितला देवी मंदिरावरून डावीकडे वळून लेखा फार्ममार्गे सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
जे कोणी अरिजित सिंहच्या कॉन्सर्टसाठी जाणार आहेत त्यांनी जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरून सेंट्रल चौकातून साई नगर फाट्याकडे पार्किंगसाठी यू-टर्न घ्यावा.
पुण्याकडून येताना
पुणे -बंगळुरू एक्सप्रेस वे वरुन येणाऱ्या वाहनांनी किवळे पुलावरून डावीकडे वळून सर्व्हिस रोडने स्टेडियमकडे जावे.
निगडी, हँगिंग ब्रिजवरून येणाऱ्या गाड्या रावेत चौक, भोंडवे चौक, कृष्णा चौक येथून उजवीकडे जातील आणि तिथून आणि स्टेडियमकडे जातील.
कोणते रस्ते बंद?
मामुर्डी गावातील रुहिज बिर्याणी ते मासुलकर फार्मकडे जाणारी वाहने जाण्यास बंदी असेल.
कार्यक्रम संपल्यानंतर मुकाई चौक आणि किवळे अंडरपास मार्गे मुंबई आणि किवळेकडे जाण्यास वाहनांना बंदी असणार आहे.





