Pune : श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवासाठी पुण्यातील वाहतूक बदल; कोणते रस्ते राहणार बंद?

पुणे – श्रीकृष्ण जयंती (१५ ऑगस्ट) व दहीहंडी उत्सव (१६ ऑगस्ट) निमित्त पुणे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने काही रस्त्यांवर वाहतूक बदल व बंदोबस्ताची अंमलबजावणी केली आहे.
पोलिस उप आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोडसारख्या मध्यवर्ती भागात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने खालीलप्रमाणे बदल केले जातील –
मुख्य बदल:
बंडगार्डन विभाग: १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते मध्यरात्रीपर्यंत तीन तोफा चौक- ब्ल्यू नाईल चौक रस्ता बंद. पर्यायी मार्ग दुतर्फा सुरू.
कोंढवा विभाग: १५ ऑगस्ट सकाळी ९ ते १६ ऑगस्ट रात्रीपर्यंत गगण उन्नती चौक व कैसर लॉजजवळील यु-टर्न बंद. खडीमशीन पोलीस चौकी-श्रीराम चौक रस्ता बंद.
वानवडी विभाग: १६ ऑगस्ट दुपारी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवरकर रोड बंद. पर्यायी मार्ग संविधान चौक व साळुंखे विहार रोडमार्गे.
फरासखाना व विश्रामबाग विभाग: १६ ऑगस्ट संध्याकाळी ४ नंतर शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोडवरील विविध चौकांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद. वाहनचालकांना टिळक रोड, एफ.सी. रोड, जुनी साततोटी चौकी इत्यादी पर्यायी मार्गांचा वापर करणे.
वाहतूक पोलीसांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





