Pune | कात्रज चौकातील वाहतुकीत बदल; अवजड वाहनांवर बंदी

कात्रज – चौकातील वाहतुकीत उड्डाणपुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर दि. ३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आले आहेत. मुख्य चौकात सेगमेंटल लॉचिंगचे काम सुरू करण्यात येत असल्याने वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला असून अवजड वाहनांना पूर्णत: बंद घालण्यात आली आहे. याबाबत पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी लागू असेल, असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
संबंधित आदेशान्वये कात्रज चौकात अवजड वाहने वाहनांना बंदी असणार आहे. साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुलापासून आणि नविन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे आणि मुंबईकडून वारजेमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद राहणार आहे.
तसेच, सोलापुरकडून हडपसर- मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, सासवडकडून मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडीमशिन चौकापुढे, मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.
सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडून कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांही प्रवेश बंदी करण्यात असणार आहे. मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक वाहनांना रात्री १० वाजल्यापासून सकाळी ४:०० वाजेपर्यंत प्रवेश चालू ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंदी असणार आहे.
एसटी बसेस व ट्रॅव्हल्स…
मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या एसटी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांना नवले पूल येथून प्रवेश बंद असेल तसेच, साताऱ्याकडून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बसेस व ट्रॅव्हल्स बसेसने नवले पुलाखालुन उजवीकडे वळण घेऊन कात्रज येथुन स्वारगेटकडे जावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
सदरील आदेश हे मार्गावरील
“अवजड वाहनांसाठी आदेश काढण्यात आले असून स्थानिक दुचाकी चालकांसाठी आणि चारचाकी वाहनांसाठी नेहमीचा रस्ता खुला असणार आहे. परंतु. नागरिकांनी पुढील काही काळ कात्रज चोकातील प्रवास टाळून पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करीत आहे.” – अमोल झेंडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस, पुणे शहर.





