पुणे : पीएमपी बसमधून 96 हजारांची रक्कम लंपास
Updated On:

पुणे –पीएमपी बसमधील प्रवासी महिलेच्या पर्समधून 96 हजार 500 रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी 10 ते 11 या कालावधीत घोटावडे फाटा ते कर्वेरस्त्यावरील गरवारे शाळा बसथांबादरम्यान घडली.
पिरंगुट येथील 40 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचे कटलरी वस्तू विक्रीचे दुकान आहे. त्या माल खरेदी तसेच पूर्वीची उधारी देण्यासाठी पैसे घेऊन पीएमपी बसने शहरात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रक्कम लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे तपास करीत आहेत.





