pune : मंगळवारी नोंदविली दहा साक्षीदारांची साक्ष
pune :
Updated On:

पुणे – नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटला अंतिम टप्प्यात आला आहे. यामध्ये मंगळवारी (दि. ९) १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सरकारी पक्षाकडून ४८ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. पुढील ५ ते ६ दिवसांत उर्वरित सर्व साक्षीदारांची साक्ष पूर्ण होणार आहे.
या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील अजय मिसर साक्ष नोंदवित आहेत. जलतगतीने या खटल्याची इन कॅमेरा सुनावणी सुरू आहे. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ही सुनावणी होत आहे.





