Pune : हांडेवाडी चौकात भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

पुणे – हांडेवाडी चौक ते मंतरवाडी चौक मार्गावर शेल पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात बजाज पल्सर मोटरसायकलवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकखाली आलेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.
मृतांची ओळख पटविण्यात आली असून मृतदेह पुढील तपासासाठी ससून हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहेत. दरम्यान, अपघातानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रक चालकास ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.
घटनास्थळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने ती सुरळीत करण्यात आली. दरम्यान, शहरात दिवसा जड वाहनांवर बंदी असतानाही अशा वाहनांची वर्दळ अनेक ठिकाणी होत असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत असून, ट्रक चालक व मालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा :





