Pune News : झांबरे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी पती अक्षय झांबरेला अटक; सासूसह चौघांवर गुन्हा दाखल
Pune News : पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेच्या आत्महत्या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी मोठी कारवाई करत पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे.

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. पायल अक्षय झांबरे (वय २९) हिच्या आत्महत्येप्रकरणी पती अक्षय, सासू मंगल झांबरे, अरविंद झांबरे आणि अक्षता झांबरे निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक कारणातून पायल हिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. (Pune News)
पायल झांबरे ही मुकुंदनगर, सहकारनगर येथे राहत होती. काही वर्षांपूर्वी तिचा अक्षय झांबरे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पायल हिचे एमबीएचे शिक्षण पूर्ण झाले होते. ती खेडशिवापूर येथील व्यावसायिक आणि नक्षत्र पॅलेसचे मालक पवार यांची मुलगी होती. (Pune News)
सोमवारी सकाळी पायल हिने दुसऱ्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तिचे सासूसोबत वाद झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. कौटुंबिक कारणावरून पायल हिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Pune News)
पायलच्या मृत्यूची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी मुकुंदनगर येथे धाव घेतली. संतप्त नातेवाईकांनी झांबरे यांच्या घराची तसेच मंगलकार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Pune News)
या प्रकरणी पायलच्या भावाने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पती अक्षय झांबरे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत. (Pune News)
Payal Zhambre : IT इंजिनिअर पायल झांबरे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा; भावानं सगळंच सांगितलं






