PUNE: स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार
Updated On:

पुणे – किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्यावर सोमवारी (दि. १५) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी पार्कसमोर, हॉटेल शिवसागरच्या मागे असलेल्या ‘स्वरमयी गुरूकुल’ या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव सोमवारी सकाळी नऊ ते १२ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
त्यानंतर दुपारी १२ वाजता जंगली महाराज रस्त्यावरून वैकुंठ स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघेल आणि दुपारी एकच्या सुमाराला अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती यांनी दिली आहे.
टॅग्स:





