पुणे : सुपर स्प्रेडर सर्वेक्षणात सापडले 288 करोनाबाधित

पुणे –जिल्ह्यात सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे ग्रामीण भागातील करोना बाधित दर कमी होत आहे. मागील दहा दिवसांत तब्बल 90 हजार 953 जणांच्या सर्वेक्षणामध्ये 288 बाधित सापडले. प्रत्येक आठवड्याला एक ते दीड हजारांच्या आसपास सापडणारी बाधित संख्या तीनशेपर्यंत खाली आली आहे.
करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध सर्वेक्षणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी अशा सुपर स्प्रेडर्सचे सर्वेक्षण सुरू ठेवले आहे.
दि. 12 ते 26 मेदरम्यान 27 हजार 663 सुपर स्प्रेडर सर्वेक्षणातून 569 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दि.8 ते 16 जूनदरम्यानच्या सर्वेक्षणात 192 सुपर स्प्रेडर सापडले. दि.17 ते 23 जून 242 सुपर स्प्रेडर सापडले. 30 जून ते 6 जुलैदरम्यान 80, तर 7 ते 14 जुलैदरम्यान 288 बाधित सापडले.





