Pune : ‘एसपीज्’चा १३वा बिर्याणी फेस्टिव्हल धूमधडाक्यात पार; रसिकांचा उदंड प्रतिसाद

पुणे : एस्.पी.ज् बिर्याणी फेस्टिव्हल ४ ऑक्टोबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. यावेळी रसिकांच्या उदंड प्रतिसादात मिळाला. ४ ऑक्टोबरला सुरू झालेल्या या बिर्याणी फेस्टिव्हलचा आस्वाद १९ नोव्हेंबरपर्यंत सर्वांना घेता येणार आहे.
बिर्याणी फेस्टिव्हलचे हे यंदाचे तेरावे वर्ष आहे. यंदा बिर्याणी फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून आयआरएस् दीपिका तांगडकर, मा. रंजनकुमार शर्मा (जॉईंट सीपी, पुणे), मा. जयंत महाबोले, डॉ. संदीप साठे आयआरएस् (जॉईंट कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स, पुणे), मा. राज देशमुख, मा. प्रसाद वाघचौरे यांची उपस्थिती होती.
एसपीज् बिर्याणी हाऊसची दिलखूश करणारी बिर्याणी जवळपास 30 वर्षे खवैयांच्या जिभेवर अधिराज्य करीत आहे. २५व्या वर्षानिमित्त परफेक्शनिस्ट आमिर खान यांनीही ‘एसपी’ज्ला भेट देऊन येथील बिर्याणीचा आस्वाद घेतला. यानिमित्त खास तयार केलेली आमिर खान स्पेशल बिर्याणी आज सर्वांनाच आपल्या स्वादाने भूरळ घालत आहे.
इतक्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बिर्याणी त्यांच्या अस्सल स्वादासह खवैयांना चाखता यावे यासाठीच हा भव्य बिर्याणी महोत्सव सुरू केला. केवळ पुण्यातीलच नव्हे तर तमाम बिर्याणी लव्हर्सने यास भरभरून पाठिंबा दिला.

प्रत्येकवेळी या बिर्याणी फेस्टिव्हलमध्ये काहीतरी नवीन देण्याचा यांचा प्रयत्न असतो. या ही वर्षी अरेबियन, कलकत्ता आणि केरळा या नवीन मटण व चिकन बिर्यार्णीची आपल्या यादीत वाढ झाली आहे. पण यासोबतच खासमखास मलमल मटण दम बिर्याणी, पर्शियन, काश्मिरी, हैद्राबादी, बलुची, महाराजा, मोघलाई, नवाबी, अफगाणी, मराठा, दुबई अशा अनेकानेक मटण व चिकन बिर्यार्णीची लज्तही तुम्हाला घेता येणार आहे.
फेस्टिव्हल जरी बिर्याणीचा असला तरीही राजस्थानी लाल मटण, मटण रोगन जोश, मटण हिरवा मसाला, लजीज तवा खिमा आणि अशाच सरस व स्वादभरीत डिशही तुम्हाला चाखता येणार आहे. नॉनव्हेज खवैयांसोबतच इथे व्हेजप्रेमींसाठी पनीर मसाला, आख्खा मसूर, शाही व्हेज दम बिर्याणी, व्हेज मराठा अशाही लाजवाब डिशेसचा स्वाद घेता येणार आहे.





