Pune : उकाड्याने हैराण, पारा दोन अंशाने वाढला
Updated On:

पुणे – शहरासह उपनगरात आज, (बुधवार) सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे कमाल तापमान दोन अंशाने वाढ झाल्याने २८ अंशावरील कमाल तापमान ३० अंशावर पोहचले. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील तर पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
मंगळवारी (दि. १५) पावसाने दमदार हजेरी लावली आणि आता पाऊस जोर पकडणार असे वाटत असताना दुपारनंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. आज दिवसभर पावसाने उघडीप दिली. जिल्ह्यातील काही भागात हलक्या तर घाटमाथ्यावर मध्यम सरी पडल्या. भोर आणि कुरवंडे येथे ६ तर निमगिरी परिसरात १ मिमी पावसाची नोंद झाली. शहर परिसरात तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडा जाणवत होता. पुढील चार ते पाच दिवस शहरासह जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आ





