पुणे : मनपा निवडणूक आखाड्यात ‘शेकाप’ही उतरणार

पुणे – “पुणेकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी महापालिकेची आगामी निवडणूक भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) पूर्ण ताकदीने लढवणार,’ अशी घोषणा पक्षाचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी विभाग संघटक दीपक पाटील, आयटी-सेलचे प्रमुख अतुल पिसाळ, चंद्रशेखर नलावडे उपस्थित होते.
आल्हाट म्हणाले, “प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांना पुणे शहराचा कारभार करण्याची संधी नागरिकांनी दिली. परंतू त्यांच्या दिशाहीन, नियोजनशून्य कारभारामुळे या ऐतिहासिक शहराची बिकट अवस्था झाली आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चारही पक्षांनी नागरिकांच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील निवारा, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतूक अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, पुणेकर या कारभारला वैतागले आहेत. त्यामुळे जनतेचे मुलभूत प्रश्न घेऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकीत समविचारी पक्ष आणि विविध संघटना एकत्र येऊन 110 जागा लढवणार आहोत.





