Pune : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे ‘सैनिक सन्मान’ गुंतवणुक योजनेचे अनावरण…

पुणे – कारगिल विजय दिनाच्या घटनेला आज 25 वर्षे पूर्ण झाली. या दिनाचे औचित्य साधत ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’च्या वतीने सर्व शाखानिहाय परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी सेनापती बापट रोडवरील विभागीय कार्यालयात यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकमान्य सैनिक सन्मान गुंतवणुक योजनेचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी ब्रिगेडियर प्रसाद जोशी (निवृत्त), कर्नल शशिकांत महाजन (निवृत्त), नायक विभाकर काटे (निवृत्त), लष्कराच्या शस्त्रास्त्र विभागाच्या पुणे येथील तांत्रिक शाखेच्या अधिकारी शुभदा कापडे व त्यांचे पती संजीव कापडे, लोकमान्य सोसायटी पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, सहा. क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावून सैनिकांनी केवळ देशरक्षणच केले नाही तर आव्हानात्मक परिस्थितीतही पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चीत करीत विजय मिळवला. सैनिकांचे हे साहस अलौकिक आहे. असे गौरवौद्गार यावेळी बोलताना सुशील जाधव यांनी काढले.
धनलाभ मुदत ठेव योजना; लोकमान्य सोसायटीतर्फे सभासदांसाठी उपक्रम
ते पुढे म्हणाले की, देशसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सैनिकांसाठी लोकमान्य सोसायटीने एक सन्मानाची गोष्ट म्हणून सैनिक सन्मान ही गुंतवणुक योजना आजच्या दिवशी जाहीर केली आहे. या गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूकदारांना १०.८०% परतावा मिळणार असून किमान गुंतवणूक ही रू. १०००० आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.५ % अधिकचा व्याजदरसुद्धा उपलब्ध आहे. सदर योजनेचा कालावधी २५ महिने आहे. भारतीय सैन्यातील सेवेत किंवा निवृत्त सैनिक, शाहिद जवानांच्या वीर पत्नी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
याचा लाभ सर्व आजी-माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सभासद-ग्राहक व विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





