PUNE: पूना हाॅस्पिटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची अफवा
Updated On:

पुणे – नवी पेठ परिसरातील पूना हाॅस्पिटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर एकच धावपळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची पाहणी केली. तेव्हा कोणत्याही प्रकारची वस्तू सापडली नाही.
पूना हाॅस्पिटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आला. या घटनेची माहिती विश्रामबाग पोलीस, तसेच बाॅम्ब शाेधक पथकाला देण्यात आली. बाॅम्बच्या अफवेमुळे परिसरात घबराट उडली. बाॅम्ब शोधक व नाशक पथकाने परिसराची तपासणी केली. संशयास्पद वस्तूंची तपासणी केली. मध्यरात्रीपर्यंत तपासणी करण्यात आली. बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.





