पुणे : परदेशांतून आलेल्या दीड लाख जणांची आरटी-पीसीआर
Updated On:

पुणे – “ओमायक्रॉन’ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या सुमारे दीड लाख नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, त्यातील 20 हजार 920 नागरिक अतिजोखमीच्या देशातून आले आहेत. तर, अन्य 1 लाख 22 हजार 206 नागरिक हे अन्य देशातून भारतात आले आहेत.
अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्वच नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली असून, अन्य देशातून आलेल्या 3 हजार 691 जणांची टेस्ट करण्यात आली आहे. यातील 115 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. याशिवाय, राज्यात एकूणच 588 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असून, त्यातील 77 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे.





