पुणे – संचारबंदीचे निर्बंध शिथिल : सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे
Updated On:

पुणे(प्रतिनिधी) : शहरात लागू असलेल्या संचारबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असून सोमवारपासून (१ जून) संचारबंदीचे आदेश रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत लागू राहणार आहे. ३० जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
टाळेबंदीचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. यापूर्वी शहरात संचारबंदीचे आदेश सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत लागू होते. टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला असला तरी सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी टप्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यानंतर शहरातील संचारबंदीचे आदेश शिथिल करण्यात आले आहेत.
नवीन आदेशानुसार संचारबंदीचे आदेश दररोज रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत लागू राहणार आहेत, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कळविले आहे.





