वाहतुकीसाठी बंद केलेल्या भिडे पुलावर पुणेकर करताहेत फोटोसेशन !
Updated On:

पुणे : पुणे तिथे काय उणे ? असे आपण नेहमीच ऐकत असतो. पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने बाबा भिडे पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे भिडे पुलाच्या दोन्ही बाजूना बॅरिकेड लावून पूल वाहतुकीस बंद केला आहे.
वाहतुकीसाठी बंद केलेल्या भिडे पुलावर अनेक दुचाकीचालक ये जा करत असून अनेक नागरिक पुलावर धोकादायकरीतीने थांबून फोटोसेशन करत असताना पाहायला मिळत आहे.





