पुणे: ऑनलाईन फसवणूक प्रकरणात दिलासा

पुणे – रुग्णालयात लिफ्ट बसविण्याचे टेंडर पास झाल्याचे सांगून फोन करून 56 हजार 400 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणात सत्र न्यायाधीश ए.आय.पेरमपल्ली यांनी तेजस अशोक शहा (रा. कारेगाव, ता. शिरूर) याला जामीन मंजुर केला. सहा महिने विलंबाने एफआयआर आहे. विलंबाचे कारण दिले नाही.
आरोपीकडून गुन्ह्यासंबंधी कोणतीही जप्ती नाही. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणताही पुरावा नसल्याचा बचाव पक्षाचे वकील राकेश सोनार यांच्या युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने निकाल दिला. ऍड. सोनार यांना ऍड. सुदर्शन खाडे, ऍड. वैभवी वंडकर आणि महेश देशमुख यांनी सहकार्य केले.
याबाबत विठ्ठल भोसले (वय 48) यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसर बंडगार्डन पोलिसांनी फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. तळेगाव दाभाडे येथून एका रुग्णालयाचा ऍडमिनिस्ट्रेशन बोलत असल्याचे सांगून एनईएफटीद्वारे खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





