पुणे: पुण्यातील कसबा मतदार संघात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांचे “जनतेच्या मनातील आमदार” असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरबाजीमुळे कसबा विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अखेर रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लावलेले बॅनर काढायला सांगितले. त्यानुसार हे सर्व बॅनर काढण्यात आले आहेत. धंगेकर यांचे बॅनर जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख करत लावण्यात आल्याने आमदार हेमंत रासनेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. अखेर काही वेळातच धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांना हे बॅनर काढालयला लावले आहेत. अनेकांचे फोन जाताच आणि कसब्यात युती धर्म पाळता यावा म्हणून हे बॅनर काढायला लावले आहेत, अशी माहिती मिळत आहे. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर या बॅनरमध्ये धंगेकरांच्या समर्थकांनी जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख केला आहे. यातून आमदार हेमंत रासनेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील धंगेकरांना भाजपमध्ये घेतले असते तर मी भांडलो असतो, असे म्हणत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत असल्याचे पाटील म्हणाले होते. युतीचा धर्म पाळला अशी तंबी मिळाल्यानंतर हे बॅनर उतरवण्यात आले आहेत.